अमेरिकेच्या हाऊस स्पीकर Nancy Pelosi यांचे तैवानमध्ये आगमन; विमानतळावर झाले जंगी स्वागत

वाढत्या तणावादरम्यान नॅन्सी पेलोसी यांना घेऊन जाणारे अमेरिकन हवाई दलाचे विमान तैवानमध्ये उतरले आहे

Nancy Pelosi (संग्रहित संपादित प्रतिमा)

यूएस हाउस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढला आहे. चीन सातत्याने नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीचा विरोध करत आहे. आता माहिती मिळत आहे की, या वाढत्या तणावादरम्यान नॅन्सी पेलोसी यांना घेऊन जाणारे अमेरिकन हवाई दलाचे विमान तैवानमध्ये उतरले आहे. हे विमान भारतीय वेळेनुसार संध्याकाळी उशिरा 8.20 वाजता तैवानमध्ये पोहोचले.  चीन तैवानवर आपला हक्क सांगत आहे आणि नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे तिथल्या चिनी प्रभावावर परिणाम होऊ शकतो, असे चीनला वाटते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement