Subway Launches 3-Inch Mini Sandwich: महागाईने त्रस्त असलेल्या पाकिस्तानमध्ये सबवेने लाँच केला 3-इंची सँडविच; प्रथमच कमी केला पदार्थाचा आकार

सबवे सहसा 6-इंच आणि 12-इंच आकाराचा सँडविच विकतो, परंतु पाकिस्तानमधील लोकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी मेन्यूमध्ये मिनी सँडविच जोडले आहेत.

Subway

गेल्या दीड वर्षात पाकिस्तानमधून महागाईसंदर्भात अनेक बातम्या समोर आल्या आहेत. कधी पीठ-डाळीवरून तर कधी पेट्रोल-डिझेलवरून लोकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही बातम्या येत होत्या. आता याच संदर्भात आणखी एक बातमी समोर आली आहे. महागाईशी झुंजत असलेल्या पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या फास्ट फूड चेन सबवेने तीन इंची सँडविच लाँच केले आहे. प्रथमच, या फास्ट-फूड चेनने जागतिक स्तरावर सँडविचची छोटी आवृत्ती लाँच केली आहे, ज्याची किंमत 360 पाकिस्तानी रुपये आहे. सबवे सहसा 6-इंच आणि 12-इंच आकाराचा सँडविच विकतो, परंतु पाकिस्तानमधील लोकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी मेन्यूमध्ये मिनी सँडविच जोडले आहे. पाकिस्तानमध्ये ऑगस्टमध्ये, वार्षिक आधारावर महागाई दर 27.38% होता. पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने अन्नधान्य महागाई 38.5 टक्क्यांवर पोहोचली आहे. एक वर्षापूर्वी ऑगस्टमध्ये ती 6.2% होती. (हेही वाचा: Pakistan General Election 2023 Date: राष्ट्रपतींनी पाकिस्तानात 'बंड' केले सुरू! निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली ही मागणी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या

KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक

KKR vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीगच्या 58 व्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल

RCB vs KKR: आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यावर पावसाचे सावट, जर सामना रद्द झाला तर कोणता संघ जाणार बाहेर?

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement