Shocking Video: जकार्ता इस्लामिक सेंटरला भीषण आग; पाहता-पाहता कोसळला (Watch)

मशिदीचे नूतनीकरण करण्याचे काम असलेल्या कंत्राटदार कंपनीच्या चार कामगारांची चौकशी करण्यात आली आहे.

Fire Engulfs Jakarta Islamic Centre

उत्तर जकार्ता येथील जामी मशिदीच्या मोठ्या घुमटाला आग लागली आणि पाहता-पाहता तो कोसळला. साधारण दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुधवारी या मशिदीच्या नूतनीकरणाची काम चालू होते, त्यावेळी अचानक दाट काळा धूर हवेत पसरताना दिसला त्यावेळी आग लागल्याची माहिती सर्वदूर झाली. ही मशीद जकार्ता इस्लामिक सेंटर इमारतीच्या संकुलात स्थित आहे. हे इस्लामिक अभ्यास आणि विकास या विषयावर एक थिंक टँक आहे. या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. घटनेच्या कारणाचा तपास केला जात आहे. पोलिसांनी याबाबत सांगितले की, मशिदीचे नूतनीकरण करण्याचे काम असलेल्या कंत्राटदार कंपनीच्या चार कामगारांची चौकशी करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now