Nepal Earthquake: नेपाळमधील भूकंपानंतर दोन दिवसांनी शोध-बचाव मोहीम संपली, 157 हून अधिक लोकांचा मृत्यू

रविवारी प्रसारमाध्यमांना माहिती देताना नेपाळचे गृहमंत्री नारायण काझी श्रेष्ठ यांनी सांगितले की, शोध आणि बचाव कार्य पूर्ण झाले आहे.

Nepal Earthquake (PC - ANI)

पश्चिम नेपाळमध्ये शुक्रवारी मध्यरात्री 6.4 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला. जेव्हा लोक रात्री गाढ झोपलेले होते. त्याचवेळी भूकंप झाला. भूकंपानंतर पश्चिम नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून बचावकार्य सुरू होते. रविवारी प्रसारमाध्यमांना माहिती देताना नेपाळचे गृहमंत्री नारायण काझी श्रेष्ठ यांनी सांगितले की, शोध आणि बचाव कार्य पूर्ण झाले आहे. आता आमचे लक्ष बाधित लोकांना मदत करण्यावर आहे. नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या विनाशकारी भूकंपात 157 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पाहा पोस्ट -