Peru Fire: अरेक्विपा येथील सोन्याच्या खाणीत लागलेल्या भीषण आगीत 27 कामगाराचा मृत्यू (पहा व्हिडिओ)
अरेक्विपा या दक्षिणेकडील प्रदेशात पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.
दक्षिण पेरूमधील एका सोन्याच्या खाणीत लागलेल्या आगीत 27 लोकांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका निवेदनात, स्थानिक सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अरेक्विपा या दक्षिणेकडील प्रदेशात शनिवारी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. स्थानिक मीडिया आणि सोशल मीडियावरील प्रतिमांमध्ये साइटमधून धुराचे गडद प्लम्स बाहेर पडत असल्याचे दिसून आले. या खाणीचे संचालन यानाक्विहुआ या कंपनीद्वारे केले जाते.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)