Earthquake in Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के, 4.3 रिश्टर स्केलची तीव्रता; लोक घाबरले

नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, 4.3 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता होती.

Earthquake. (Photo Credits: PTI)

Earthquake in Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री उशीरा 2.26 वाजता भूकंपाचे धक्के नागरिकांना जाणवले. भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने, भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. काही दिवसांपूर्वी असाच भूकंपाचा धक्का अफगाणिस्तानमध्ये जाणवला होता. 28 मार्च रोजी पहाटे 5:44 च्या सुमारास अफगाणीतस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तेव्हा भूकंपाची तिव्रता 4.2 रिस्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. एनसीएसच्या आकडेवारीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू 36.36 अक्षांश आणि 71.18 रेखांशावर 124 किमी खोलीवर होता.(हेही वाचा : Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानात 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, अद्याप कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त नाही)



संबंधित बातम्या