Bizarre Bank Policy: जपानी बँकेचे अजब धोरण; कर्मचाऱ्याने फसवणूक केल्यास करावी लागेल आत्महत्या

असे झाल्याचे आढळल्यास ते आत्महत्या करतील.

Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Bizarre Bank Policy: जपानी लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या नैतिकतेसाठी ओळखले जातात. अशा परिस्थितीत, जपानमधील कार्यालांमध्ये जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात कठोर आणि मजबूत धोरणे आपल्याला दिसतात. आता असेच एका जपानी बँकेचे धोरण किंवा तिथला नियम चर्चेत आहे. या धोरणांतर्गत एखादा कर्मचारी आर्थिक अनियमिततेत गुंतलेला आढळल्यास त्याला आत्महत्या करावी लागू शकते. जपानच्या शिकोकू बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली आहे की, ते कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारात सहभागी होणार नाहीत आणि कोणत्याही प्रकारे निधी चोरणार नाहीत किंवा त्यांचा गैरवापर करणार नाहीत. असे झाल्याचे आढळल्यास ते आत्महत्या करतील.

जपानमधील एका X खात्यावर बँकेच्या वेबसाइटचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ही विचित्र शपथ दिसली. शिकोकू बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेल्या शपथेबाबत पोस्टाने वृत्त दिले आहे की, 'या बँकेत नोकरी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने बँकेतून पैसे चोरले किंवा इतरांना चोरी करण्यास प्रवृत्त केले तर, तो स्वतःच्या मालमत्तेतून त्याची परतफेड करेल आणि नंतर आत्महत्या करेल.' बँकेच्या वेबसाइटनुसार, 23 कर्मचाऱ्यांनी रक्ताने शपथेवर स्वाक्षरी केली आहे. बँकेच्या कामकाजाची खात्री करण्यासाठी ही शपथ तयार करण्यात आली आहे. (हेही वाचा: New York Employee Files Lawsuit: व्यवस्थापनाने अयोग्य टेबल दिले, न्यूयॉर्क लायब्ररीमधील कर्मचाऱ्याने दाखल केला 4.6 दशलक्ष डॉलर्सचा दावा)

Staff Signs Pledge to ‘Commit Suicide’ if They Steal: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)