China Crime: चीनमध्ये एका विद्यार्थ्याने लोकांवर चाकूने केला जीवघेणा हल्ला, 8 जणांचा मृत्यू, 17 जखमी
या चाकू हल्ल्यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. यिक्सिंग शहरातील पोलिसांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली
चीनच्या वूशी शहरात एका 21 वर्षीय विद्यार्थ्याने 8 जणांची हत्या केली. या चाकू हल्ल्यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. यिक्सिंग शहरातील पोलिसांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली आणि एएफपीला सांगितले की, जिआंगसू प्रांतातील वूशी व्होकेशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड टेक्नॉलॉजी येथे संध्याकाळी हा हल्ला झाला. घटनास्थळी संशयिताला ताब्यात घेण्यात आले. यिक्सिंग सार्वजनिक सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, संशयित (पुरुष, 21, संस्थेचा 2024 पदवीधर), परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे आणि डिप्लोमा मिळवू न शकल्यामुळे राग काढण्यासाठी कृत्य म्हणून हा हल्ला केला,
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)