South Korea: अग्नीतांडव! दक्षिण कोरियामध्ये लिथियम बॅटरी प्लांटला भीषण आग; 21 जणांचा मृत्यू (Watch Video)
दक्षिण कोरियामधील लिथियम बॅटरी प्लांटमध्ये आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. लिथियम बॅटरी प्लांटमध्ये लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
South Korea: दक्षिण कोरियामधील लिथियम बॅटरी प्लांटमध्ये आगीची (Lithium Battery Plant Fire)मोठी दुर्घटना घडली आहे. लिथियम बॅटरी प्लांटमध्ये लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू( Died) झाला आहे. दक्षिण कोरियामधील प्रमुख वृत्तसंस्था मानल्या जाणाऱ्या योनहाप न्यूज एजन्सीने त्याबाबतची माहिती दिली. तेथे आगीचे मोठे लोट आकाशात पसरलेले दिसत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आगीचे कारण समोर आलेले नाही. (हेही वाचा:Kuwait Fire: कुवेतमधील आगीच्या घटनेत मृतांपैकी 12 केरळ नागरिकांची ओळख पटली, राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज तातडीने रवाना)
आगीचा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)