'भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि स्वीकारणारही नाही' PM Modi यांनी US President Donald Trump यांना स्पष्ट सांगितल्याची Foreign Secretary Vikram Misri यांची माहिती

पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्ट केले की या संपूर्ण प्रकरणात, कधीही, कोणत्याही स्तरावर, भारत-अमेरिका व्यापार करार किंवा भारत आणि पाकिस्तानमधील अमेरिकेच्या मध्यस्थीसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही.

Donald Trump, Prime Minister Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कॅनडामध्ये झालेल्या च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोन वर संवाद साधल्याची माहिती आहे. अर्ध्या तासाहून अधिक काळ चाललेल्या या संभाषणात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली आणि पाकिस्तानसोबतच्या मुद्द्यांवर भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि कधीही स्वीकारणार नाही, असा संदेश ठामपणे दिल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी आज दिली आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्ट केले की या संपूर्ण प्रकरणात, कधीही, कोणत्याही स्तरावर, भारत-अमेरिका व्यापार करार किंवा भारत आणि पाकिस्तानमधील अमेरिकेच्या मध्यस्थीसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोन वर संवाद साधल्याची माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement