Delhi Shocker: दिल्लीतील डीबीजी रोड परिसरात अंगावर एसी पडल्याने तरुणाचा मृत्यू, दुसरा जखमी (Watch Video)
दोन मित्र रस्त्याच्या कडेला बोलत उभे असताना अचानक त्यांच्या अंगावर एसी पडला. भरपूर उंचावरून एसी पडल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यासोबत असलेला तरूण जखमी झाला आहे.
Delhi Shocker: दिल्लीतील डीबीजी रोड परिसरात धक्कादायक घटना घडली. दोन मृत तरून एसीच्या वजनाने चेंडूसारखा उसळला. ही घटना घडल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यामुळे रस्त्यावर काही अंतरावर असलेले नागरिक घाबरले आणि त्यांनी दुखापतग्रस्तांकडे धाव घेतली. या घटनेचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. (हेही वाचा: VIDEO: बुलंदशहरमध्ये भीषण अपघात! पिकअप आणि बसची धडक, रक्षाबंधन साजरी करण्यासाठी जाणाऱ्या अनेकांचा मृत्यू)
व्हिडीओ :
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)