Twitter Edit Feature: ट्विटर युजर्ससाठी खुशखबर; लवकरच उपलब्ध होणार 'एडिट' फिचर, कंपनी करत आहे चाचणी

हे फिचर व्यापकपणे उपलब्ध होण्याआधी लोक त्याचा कसा गैरवापर करू शकतात याची संपूर्ण माहिती कंपनी मिळवू इच्छित आहे.

Twitter logo (Photo courtesy: Twitter)

ट्विटरवर 'एडिट बटण' हे आजपर्यंत सर्वात जास्त विनंती केलेले फिचर आहे. आता लवकरच युजर्सना हा पर्याय उपलब्ध होणार आहे. म्हणजेच लवकरच युजर्स एखादे ट्विट पोस्ट केल्यानंतर ते संपादित करू शकतील. कंपनी लवकरच हे फिचर रोल आउट करेल. ट्विटरने सांगितले की, सध्या या एडीट बटणाची चाचणी सुरु असून, येत्या आठवड्यात ट्विटर ब्लू सदस्यांसाठी हे फिचर उपलब्ध होईल. ट्विटर ब्लू ही कंपनीची सशुल्क सदस्यता सेवा आहे जी निवडक देशांमध्ये उपलब्ध आहे. ही सेवा अद्याप भारतात उपलब्ध नाही.

हे फिचर व्यापकपणे उपलब्ध होण्याआधी लोक त्याचा कसा गैरवापर करू शकतात याची संपूर्ण माहिती कंपनी मिळवू इच्छित आहे. ट्विटर हे सार्वजनिक व्यासपीठ असल्याने, 'एडीट' फिचरने नवी भीती निर्माण केली आहे. कारण या पर्यायाच्या वापर फक्त चूकाच सुधारण्यासाठी नाही, तर या आधीच्या ट्रोलिंग घटना लपवण्यासाठीही केला जाऊ शकतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement