TCS Ends Work From Home: TCS ने संपवली हायब्रीड वर्किंग पॉलिसी; कर्मचार्‍यांना 1 ऑक्टोबरपासून कार्यालयात रुजू व्हावे लागणार

सध्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ तीन दिवस कार्यालयात उपस्थित राहावे लागते. सप्टेंबरच्या मध्यात पाठवलेल्या अधिकृत मेलमध्ये TCS ने आपल्या कर्मचाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून पाच दिवस कार्यालयात परत येण्यास सांगितले होते.

TCS (PC - Wikipedia)

TCS Ends Work From Home: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आपले हायब्रीड वर्किंग पॉलिसी संपवण्याच्या तयारीत आहे. एका अंतर्गत ई-मेलमध्ये कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी 1 ऑक्टोबरपासून आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात हजर राहावे. सध्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ तीन दिवस कार्यालयात उपस्थित राहावे लागते. सप्टेंबरच्या मध्यात पाठवलेल्या अधिकृत मेलमध्ये TCS ने आपल्या कर्मचाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून पाच दिवस कार्यालयात परत येण्यास सांगितले होते. ई-मेलमध्ये असे म्हटले आहे की, सीईओ आणि मुख्य मानव संसाधन अधिकारी (सीएचआरओ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2023 पासून सर्व कामकाजाच्या दिवसांमध्ये (सुटी नसल्यास) प्रत्येक आठवड्यात 5 दिवस उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now