Malware Attacks in India: भारतात 2022 मध्ये तब्बल 7 लाख मालवेअर हल्ले; बँकिंग क्षेत्र सर्वात असुरक्षित

सायबर गुन्हे वाढवण्यात मालवेअर सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही संगणक सॉफ्टवेअर्स आहेत जी नेटवर्कद्वारे वापरकर्त्याच्या संगणकावर चुकीच्या पद्धतीने प्रवेश करतात आणि नंतर वापरकर्त्याचा डेटा चोरतात.

Cyber-attack | Representational Image (Photo Credit: PTI)

गेल्या काही वर्षांमध्ये सायबर हल्ल्यांचे परमन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आता माहिती मिळत आहे की, 2021 मध्ये भारतात 6.5 लाखांहून अधिक मालवेअर हल्ले झाले आहेत आणि 2022 मध्ये सुमारे 7 लाख. या हल्ल्यांमुळे बँकिंग क्षेत्र सर्वाधिक असुरक्षित राहिले. बँकिंग क्षेत्रातील एकूण घटनांबद्दल बोलायचे झाले तर, देशाला 44,949 मालवेअर हल्ल्यांना सामोरे जावे लागले. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. सायबर गुन्हे वाढवण्यात मालवेअर सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही संगणक सॉफ्टवेअर्स आहेत जी नेटवर्कद्वारे वापरकर्त्याच्या संगणकावर चुकीच्या पद्धतीने प्रवेश करतात आणि नंतर वापरकर्त्याचा डेटा चोरतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement