National Games 2023: अजित पवार यांनी घेतली 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची भेट; क्रीडाध्वज केला तुकडीकडे सुपूर्द

राज्यातील 900 खेळाडू व 200 मार्गदर्शक अशा एकूण 1100 सदस्यांच्या महाराष्ट्राच्या पथकाकडे क्रीडाध्वज हस्तांतर करण्याचा सोहळा तसेच शुभेच्छापर निरोप देण्याचा कार्यक्रम आज पार पडला.

अजित पवार

गोवा येथे होत असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील 900 खेळाडू सहभागी होत आहेत. हे 900 खेळाडू व 200 मार्गदर्शक अशा एकूण 1100 सदस्यांच्या महाराष्ट्राच्या पथकाकडे क्रीडाध्वज हस्तांतर करण्याचा सोहळा तसेच शुभेच्छापर निरोप देण्याचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी या पथकाची भेट घेतली.

यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्यापासून गोव्यात सुरु होत असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून, यावेळीही आपले खेळाडू उत्तम कामगिरी करतील. सर्वाधिक पदके जिंकून राज्याला अव्वल स्थान मिळवून देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदके जिंकण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षणासह सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, यापुढे खेळांडूच्या तयारीसाठी निधीची अडचण भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा: 37th National Games 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गोव्यात करणार राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन, देशभरातील खेळाडू आपली प्रतिभा करणार सादर)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now