Paris Olympic 2024: विनेश फोगाटची युक्रेनच्या ओक्साना लिवाचवर मात; उपांत्य फेरीत मिळवला प्रवेश
आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात विनेशने ऑलम्पिक सुवर्ण पदक विजेती खेळाडू सुसाकीवर विजय प्राप्त केला होता.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा आज 6 ऑगस्ट 11 वा दिवस आहे. आज भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने (50 किलो गटात) युक्रेनच्या ओक्साना लिवाचवर 7-5 असा विजय मिळवत ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारताची धाकड गर्ल विनेश फोगाटने उपांत्यपूर्व फेरीत खेळत आहे. यासह पहिल्या फेरीत शानदार पकड करत विनेशने 2 गुणांची आघाडी मिळवली होती. ही आघाडी तीने शेवटपर्यंत टिकवून ठेवली.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)