MI W vs DC W: दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सचा 9 गडी राखून पराभव
110 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्स संघाला स्फोटक सुरुवात करून सामना पूर्णपणे एकतर्फी बनवला आणि पहिल्या विकेटसाठी 56 धावांची शानदार भागीदारी केली.
महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या आवृत्तीतील 18 वा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स महिला संघाने मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना 9 गडी राखून जिंकला आणि गुणतालिकेत पहिले स्थानही मिळवले. 110 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्स संघाला स्फोटक सुरुवात करून सामना पूर्णपणे एकतर्फी बनवला आणि पहिल्या विकेटसाठी 56 धावांची शानदार भागीदारी केली. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून फलंदाजीत अत्यंत खराब कामगिरी झाली आणि संघाला 20 षटकात 8 विकेट गमावून केवळ 109 धावा करता आल्या. हेही वाचा GG W vs UP W: गुजरात जायंट्सला पराभवाची धुळ चारत यूपी वॉरियर्सची प्लेऑफमध्ये धडक
🔝 OF THE TABLE!@DelhiCapitals chase down the 🎯 with 11 overs to spare and move to the top of the points table!
Scorecard ▶️ https://t.co/Gcv5Cq5nOi#TATAWPL | #MIvDC pic.twitter.com/L1IGiCAEmg
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2023 10:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

