Yuvraj Singh ने घेतली Rishabh Pant ची भेट, पोस्ट शेअर करत चॅम्पियनसाठी लिहिली मोठी गोष्ट
युवराज सिंगने गुरुवारी संध्याकाळी ऋषभ पंतसोबतचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये युवी आणि पंत सोफ्यावर बसले आहेत. पंतच्या उजव्या पायाला अजूनही पट्टी बांधलेली आहे, ज्यामुळे त्याच्या दुखापतीचा अंदाज लावता येईल.
स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) अपघातात मृत्यूला मात देऊन बरा झाला आहे. अलीकडेच त्याने स्विमिंग पूलमध्ये उतरतानाचा एक फोटो ट्विट केला आहे. आता माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंगने (Yuvraj Singh) त्याची भेट घेऊन ताजी परिस्थिती सांगितली आहे. युवराज सिंगने गुरुवारी संध्याकाळी ऋषभ पंतसोबतचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये युवी आणि पंत सोफ्यावर बसले आहेत. पंतच्या उजव्या पायाला अजूनही पट्टी बांधलेली आहे, ज्यामुळे त्याच्या दुखापतीचा अंदाज लावता येईल. पंतला भेटल्यानंतर युवराजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले - छोटी पावले सुरू झाली आहेत. हा चॅम्पियन लवकरच पुन्हा उठण्यासाठी सज्ज झाला आहे. युवराजने पुढे लिहिले - त्याला भेटणे आणि चांगले हसणे खूप छान वाटले. किती छान माणूस, नेहमी सकारात्मक आणि मजेदार. तुला बळ मिळो ऋषभ.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)