IND vs ENG 2nd Test Day 2 Live Score Update: यशस्वी जैस्वाल 209 धावा करून बाद, जेम्स अँडरसनची घेतली विकेट

आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. 9.30 वाजता आजच्या सामन्याला सरुवात झाली आहे. पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 336/6 अशी होती. तत्तपुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IND vs ENG 2nd Test Day 2 Live Score Update: यशस्वी जैस्वाल 209 धावा करून बाद, जेम्स अँडरसनची घेतली विकेट

IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला (IND vs ENg 2nd Test) शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. 9.30 वाजता आजच्या सामन्याला सरुवात झाली आहे. पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 336/6 अशी होती. तत्तपुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रोहित-गिल-श्रेयस अय्यर हे पुन्हा फ्लाप ठरले त्यांनी आपल्या स्वस्तात विकेट गमावल्या. दरम्यान, दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वाल 290 चेंडूत 209 धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि सात षटकार मारले. जेम्स अँडरसनने त्याला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. आता जसप्रीत बुमराह कुलदीप यादवसोबत क्रीजवर आहे. त्यांच्यानंतर मुकेश कुमारला फलंदाजीला यावे लागणार आहे. सध्या भारताची धावसंख्या 383 आहे. अशा स्थितीत भारताला 400 धावांचा टप्पा ओलांडणे कठीण होईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 03, 2024 10:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).