Team India T20I Squad: बांग्लादेश विरूद्धच्या T20 मालिकेसाठी संघाची घोषणा; SKY करणार नेतृत्व तर नितीश कुमार रेड्डीला मिळाली संधी

सूर्यासोबत हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डीलाही संधी मिळाली आहे. रियान पराग, शिवम दुबे, रवि बिष्णोई आणि हर्षित राणा यांनाही टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. तेज गोलंदाज मयांक यादवला देखील संघात स्थान मिळाले आहे.

Team India T20I Squad: बांग्लादेश विरूद्धच्या T20 मालिकेसाठी संघाची घोषणा; SKY करणार नेतृत्व तर नितीश कुमार रेड्डीला मिळाली संधी
SuryaKumar Yadav (Photo Credit - X)

Team India T20I Squad Announced:  भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधारपदात सूर्याचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान मिळाल्यामुळे त्यांना सलामीची संधी मिळू शकते. भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे.  सूर्यासोबत हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डीलाही संधी मिळाली आहे. रियान पराग, शिवम दुबे, रवि बिष्णोई आणि हर्षित राणा यांनाही टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. तेज गोलंदाज मयांक यादवला देखील संघात स्थान मिळाले आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2024 09:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).