T20 World Cup 2021, IND vs AUS: कर्णधार रोहित शर्माने Virat Kohli कडे दिला चेंडू, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात गोलंदाजी करताना पाहून नेटकरी फिदा (Watch Video)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सराव सामन्यात रोहित शर्माच्या हाती टीम इंडियाची धुरा सोपवण्यात आली. तर विराट कोहली गोलंदाज म्हणून हात आजमावताना दिसला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीत असमर्थतेमुळे संघ गोलंदाजीचा पर्याय शोधत आहे. विराट एक मध्यम वेगवान गोलंदाज आहे आणि तो संघातील पोकळी भरून काढू शकतो.

T20 World Cup 2021, IND vs AUS: कर्णधार रोहित शर्माने Virat Kohli कडे दिला चेंडू, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात गोलंदाजी करताना पाहून नेटकरी फिदा (Watch Video)
विराट कोहली बॉलिंग (Photo Credit: Twitter)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) दुसऱ्या सराव सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती टीम इंडियाची (Team India) धुरा सोपवण्यात आली. तर विराट कोहली (Virat Kohli) गोलंदाज म्हणून हात आजमावताना दिसला. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गोलंदाजीत असमर्थतेमुळे संघ गोलंदाजीचा पर्याय शोधत आहे. विराट एक मध्यम वेगवान गोलंदाज आहे आणि तो संघातील पोकळी भरून काढू शकतो. आतापर्यंत विराटने टी-20 सामन्याच्या 12 डावांमध्ये गोलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 198 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या आहेत.

विराटला 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यानंतर गोलंदाजी करताना पाहून नेटकरी देखील प्रभावित झाले.

विराट सहावा गोलंदाजी पर्याय?

विराट कोहली - परिपूर्ण टीम मॅन

फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण कर्णधार

पहा कोण गोलंदाजी करत आहे?

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2021 05:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).