ICC Rankings T20: सूर्यकुमार यादवची जबरदस्त कामगिरी, आईसीसी रैंकिंगमध्ये बाबर आझमला टाकले मागे
त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) पुन्हा एकदा फटका बसला आहे.
आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी पुन्हा टी-20 क्रमवारीत बरेच फेरबदल पाहायला मिळत आहेत. टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला (Surya Kumar Yadav) या T20 च्या क्रमवारीत जबरदस्त फायदा झाला आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) पुन्हा एकदा फटका बसला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन टी-20 क्रमवारीत पाकिस्तानचा यष्टिरक्षक आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान 825 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. बाबर आझमला हरवून तो नंबर वन बनला आणि तो कायम राखत आहे. क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर एडन मार्कराम आहे, ज्याचे 792 रेटिंग गुण आहेत. सूर्यकुमार यादव आधीच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर होता, मात्र आता तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याचे 780 रेटिंग गुण आहेत. सूर्यकुमार यादवने बाबर आझमला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)