Suryakumar Yadav Fifty: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, मुंबई इंडियन्स विजयाच्या जवळ

त्यांनी मुंबईला 100 धावांचा टप्पा सहज पार करून दिला. या दरम्यान सूर्यकुमारने 30 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.

सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 55 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 173 धावा केल्या. त्यामुळे मुंबईसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य आहे. सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर मुंबईचा डाव सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी सावरला. त्यांनी मुंबईला 100 धावांचा टप्पा सहज पार करून दिला. या दरम्यान सूर्यकुमारने 30 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे आता मुंबईच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)