SNO vs VEL, Women T20 Challenge Final: सुपरनोवाचे वेलोसिटीला 166 धावांचे लक्ष्य, Deandra Dottin ने केल्या 62 धावा

सुपरनोवा संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 165 धावा केल्या आणि वेलोसिटीला विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य दिले. संघाकडून सलामीवीर डिआंड्रा डॉटिनने 62 धावांची शानदार खेळी केली. डॉटिनने प्रिया पुनिया (28) सोबत 73 धावांची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (43) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 58 धावा जोडल्या.

SNO vs VEL, Women T20 Challenge Final: सुपरनोवाचे वेलोसिटीला 166 धावांचे लक्ष्य, Deandra Dottin ने केल्या 62 धावा
डिआंड्रा डॉटिन (Photo Credit: Twitter/IPL)

Womens T20 Challenge Final: पुण्यातील एमसीए स्टेडियमवर वेलोसिटी (Velocity) आणि सुपरनोवा (Supernovas) यांच्यात महिला टी-20 चॅलेंजचा अंतिम सामना खेळवला जात आहे. सुपरनोवा संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 165 धावा केल्या आणि वेलोसिटीला विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य दिले. संघाकडून सलामीवीर डिआंड्रा डॉटिनने (Deandra Dottin) 62 धावांची शानदार खेळी केली. महिला टी-20 चॅलेंजच्या अंतिम (WT20C Final) सामन्यातील कोणत्याची संघाचीही सर्वाधिक धावसंख्या आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 28, 2022 09:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).