RCB vs SRH, IPL 2024 Live Score Update: आरसीबीला पहिला झटका, 25 धावा करून डुप्लेसिस बाद
हैदराबादने शेवटचे चार सामने जिंकले आहेत. हैदराबाद आणखी एक सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. त्याने आतापर्यंत सातपैकी पाच सामने जिंकले असून 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी करा किंवा मरोच्या स्थितीत आहे.
RCB vs SRH, IPL 2024: आजचा आयपीएल सामना (IPL 2024) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs SRH) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. हैदराबादने शेवटचे चार सामने जिंकले आहेत. हैदराबाद आणखी एक सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. त्याने आतापर्यंत सातपैकी पाच सामने जिंकले असून 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी करा किंवा मरोच्या स्थितीत आहे. आरसीबीने आठपैकी सात सामने गमावले असून ते टेबलमध्ये तळाच्या दहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, बेंगळुरूने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीला पहिला धक्का लागला आहे. आरसीबीचा स्कोर 49/1
Match 41. 5.3: T Natarajan to Virat Kohli 6 runs, Royal Challengers Bengaluru 59/1 https://t.co/2EpEyR3PF2 #TATAIPL #IPL2024 #SRHvRCB
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2024 07:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

