Ranji Trophy 2022 Quarter-Final: पृथ्वी शॉच्या नेतृत्वात मुंबईचा ‘महा’ विक्रम, उत्तराखंडचा 725 धावांनी उडवला धुव्वा

Ranji Trophy 2022: रणजी ट्रॉफी 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत गुरुवारी मुंबईने उत्तराखंडचा 725 धावांच्या फरकाने धुव्वा उडवला. या विजयासह मुंबईने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक फरकाने विजय नोंदवला. 1929-30 च्या मोसमात न्यू साउथ वेल्सचा क्वीन्सलँडवर 685 धावांचा विजय हा यापूर्वीचा सर्वोच्च होता. तसेच रणजीत बंगालने 1953-54 मध्ये ओरिसाचा 540 धावांनी पराभव केला होता.

Ranji Trophy 2022 Quarter-Final: पृथ्वी शॉच्या नेतृत्वात मुंबईचा ‘महा’ विक्रम, उत्तराखंडचा 725 धावांनी उडवला धुव्वा
सरफराज खान मुंबई रणजी करंडक 2022 (Photo Credit: Twitter)

रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022 च्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईचा (Mumbai) सामना उत्तराखंडशी (Uttrakhand) झाला. या सामन्यात मुंबईने 725 धावांनी विजय मिळवत नवा विश्वविक्रम नोंदवला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (First Class Cricket) आतापर्यंत कोणत्याही संघाने इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवला नव्हता. यासह पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबईने चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत जागा निश्चित केली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2022 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).