Dhoni Driving Mercedes AMG: एमएस धोनी रांचीमध्ये मर्सिडीज कार चालवताना दिसला; चाहत्यासाठी गाडीची काच खालीकरून काढला फोटो

धोनी क्रिकेट आणि इव्हेंट्सपासून दूर असताना मर्सिडीज कार चालवताना दिसला आहे, एका चाहत्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एमएस धोनी त्याच्या कारमध्ये गाडी चालवताना दिसत आहे

आयपीएल 2024 संपल्यानंतर, एमएस धोनी आपल्या पत्नी आणि मुलीसोबत काही क्वॉलीटी वेळ घालवण्यासाठी त्याच्या कुटुंबासह युरोपला गेला. युरोपातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर तो पत्नी आणि मुलीसोबत दिसला. आता तो रांचीमध्ये त्याच्या घरी परतला आहे, धोनी क्रिकेट आणि इव्हेंट्सपासून दूर असताना मर्सिडीज कार चालवताना दिसला आहे, एका चाहत्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एमएस धोनी त्याच्या कारमध्ये गाडी चालवताना दिसत आहे. त्यानंतर एका चाहत्याने त्याच्यासोबत सेल्फी काढला आणि फोटो काढण्यासाठी आरसा खाली करण्याची विनंती केली, त्याने आरसा खाली करून फोटो काढला आणि लाखो चाहत्यांची मने जिंकली. त्याच्या साधेपणाचा व्हिडिओ चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे जो लगेच व्हायरल झाला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now