MS Dhoni Hugs Woman: महेंद्रसिंग धोनी 20 वर्षांनंतर त्याच्या मूळ गावी, महिलेला मिठी मारत घेतला तिचा आशीर्वाद (Watch Video)
धोनीने त्याच्या मूळ गावात गावकऱ्यांसोबत फोटोही काढले. सर्वांच्या शुभेच्छांचा प्रेमाने स्वीकार केला. यावेळी एमएस धोनी खूप आनंदी दिसला. यापैकी एका व्हिडिओ मध्ये तो एका महिलेकडून आशीर्वाद घेताना आणि तिला मिठी मारताना दिसला.
महेंद्रसिंग धोनी 20 वर्षांनंतर (MS Dhoni) त्याच्या मूळ गावी लवली येथे पोहोचला. त्यांचे आगमन होताच ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. धोनीने त्याच्या मूळ गावात गावकऱ्यांसोबत फोटोही काढले. सर्वांच्या शुभेच्छांचा प्रेमाने स्वीकार केला. यावेळी एमएस धोनी खूप आनंदी दिसला. यापैकी एका व्हिडिओ मध्ये तो एका महिलेकडून आशीर्वाद घेताना आणि तिला मिठी मारताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महिलेशी गप्पा मारताना आणि तिचे आशीर्वाद घेण्यापूर्वी तिला मिठी मारताना दिसला. ज्याचे फोटो साक्षीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (हे देखील वाचा: AUS vs SA CWC 2023 Semi Final Live Streaming: अंतिम फेरीतील भारताचा प्रतिस्पर्ध्याचा निर्णय होणार आज, ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा उपांत्य सामना; येथे पाहा लाइव्ह)