Jay Shah Becomes New ICC Chairman: जय शाह बनले आयसीसीचे नवे अध्यक्ष; डिसेंबरमध्ये स्वीकारणार पदभार

जय शाह 1 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारल्यानंतर आयसीसी अध्यक्ष बनणारे पाचवे भारतीय असतील. जय शाह ऑक्टोबर 2019 पासून बीसीसीआयचे सचिव आणि जानेवारी 2021 पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.

Jay Shah Becomes New ICC Chairman: जय शाह बनले आयसीसीचे नवे अध्यक्ष; डिसेंबरमध्ये स्वीकारणार पदभार
Photo Credit- X

Jay Shah Becomes New ICC Chairman: जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवे अध्यक्ष बनले आहेत. शाह यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे आयसीसीने म्हटले आहे. शहा हे 1 डिसेंबर रोजी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव आहेत. आयसीसी चेअरमन पदासाठी अर्ज करणारे एकमेव अर्जदार जय शाह होते. अशा स्थितीत निवडणूक झाली नाही आणि जय शहा यांची बिनविरोध निवड झाली. बीसीसीआयला आता सचिव पदावर नवीन नियुक्ती करावी लागणार आहे. अरुण जेटली यांचा मुलगा आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष रोहन जेटली बीसीसीआयचे नवे सचिव होऊ शकतात. शहा यांनी पद सोडताच त्यांची नियुक्ती होऊ शकते.

आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपणार आहे. आयसीसीने 20 ऑगस्ट रोजी सांगितले होते की बार्कले सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष होणार नाही. आता जय शाह 1 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारल्यानंतर आयसीसी अध्यक्ष बनणारे पाचवे भारतीय असतील. जय शाह ऑक्टोबर 2019 पासून बीसीसीआयचे सचिव आणि जानेवारी 2021 पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. (हेही वाचा; Olly Stone Replaces Injured Mark Wood: ऑली स्टोन तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतणार, श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त मार्क वुडची घेणार जागा)

जय शाह बनले आयसीसीचे नवे अध्यक्ष-

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2024 08:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).