IPL 2022, MI vs DC Match 69: मुंबईला दुसरा झटका, अर्धशतकाच्या तोंडावर Ishan Kishan ठरला कुलदीप यादवचा बळी
किशन आपल्या अर्धशतकापासून अवघ्या दोन धावा दूर होता जेव्हा कुलदीप यादवच्या फिरकीवर त्याने हवेत उंच फटका खेळला पण सीमारेषेवर उभा डेविड वॉर्नरने कोणतीही चूक न करता अप्रतिम कॅच घेतला.
IPL 2022, MI vs DC Match 69: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) ज्येष्ठ फिरकीपटू कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) मुंबई इंडियन्सचा सलामीवीर ईशान किशनला (Ishan Kishan) बाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. किशन आपल्या अर्धशतकापासून अवघ्या दोन धावा दूर होता जेव्हा कुलदीप यादवच्या फिरकीवर त्याने हवेत उंच फटका खेळला पण सीमारेषेवर उभा डेविड वॉर्नरने कोणतीही चूक न करता अप्रतिम कॅच घेतला. ईशानने 35 चेंडूत 48 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले.