IND vs SA 2nd Test Live Score Update: भारतीय संघ 153 धावांवर ऑलआऊट, 11 चेंडूत पडल्या 6 विकेट, 98 धावांची घेतली आघाडी

सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. तत्तपुर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला.

IND vs SA 2nd Test Live Score Update: भारतीय संघ 153 धावांवर ऑलआऊट, 11 चेंडूत पडल्या 6 विकेट, 98 धावांची घेतली आघाडी
IND vs SA (Photo Credit - Twitter)

IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. तत्तपुर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. पहिल्या सामन्यात सामान्य दिसणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दरम्यान, भारताचा पहिला डाव 153 धावांवर आटोपला आणि 98 धावाची आघाडी घेतली. भारताने शेवटच्या सहा विकेट्स एकही धाव न करता गमावल्या आहेत. एकवेळ भारताची धावसंख्या 153/4 होती. विराट कोहली आणि लोकेश राहुल फलंदाजी करत होते. यावेळी राहुल बाद झाल्याने टीम इंडियाला पुढे एकही धाव करता आली नाही.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2024 07:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).