ICC Women's World Cup 2022: सराव सामन्यात Smriti Mandhana हिच्या हेल्मेटवर लागला खतरनाक बाउंसर, विश्वचषकपूर्वी भारताच्या अडचणी वाढल्या? पहा अपडेट

रविवारी रंगीओरा येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या सराव सामन्यादरम्यान शबनिम इस्माईलच्या बाउन्सर बॉल डोक्याला लागल्यानंतर भारताची सलामीवीर स्मृती मंधाना हिची प्रकृती स्थिर आहे. आयसीसीच्या वेबसाइटवरील अहवालानुसार, या घटनेनंतर 25 वर्षीय मंधानाचे टीम डॉक्टरांनी मूल्यांकन केले आणि ती पुढे जाण्यासाठी फिट असल्याचे मानले.

स्मृती मंधाना (Photo Credit: Twitter/ICC)

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक (ICC Women's World Cup) स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) भारताच्या पहिल्या सराव सामन्यात स्टार सलामी फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्या डोक्याला शबनिम इस्माईल (Shabnim Ismail) बाऊन्सर बॉल लागला. खेळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तिच्या हेल्मेटला धक्कादायक फटका बसल्यानांतर स्मृती त्वरित रिटायर्ड-हर्ट होऊन मैदानाबाहेर पडली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)