Hardik Pandya मुळे Tilak Verma चे अर्धशतक हुकले, चाहत्यांनी केलं ट्रोल, म्हणाले - Selfish कर्णधार; पहा ट्विट

सोशल मीडियावर चाहत्यांकडून हार्दिकला शिव्या दिल्या जात आहेत. त्याला सर्वात स्वार्थी खेळाडू देखील म्हटले जात आहे.

Hardik Pandya मुळे Tilak Verma चे अर्धशतक हुकले, चाहत्यांनी केलं ट्रोल, म्हणाले - Selfish कर्णधार; पहा ट्विट

Hardik Pandya Trolled: भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विजयी षटकार ठोकला. मात्र, या षटकाराचे कौतुक होण्याऐवजी सोशल मीडियावर तिरस्कारच व्यक्त होत आहे. या षटकारासाठी हार्दिकला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. त्याच्या षटकारांनी तिळक वर्माला (Tilak Verma) सलग दुसरे अर्धशतक पूर्ण करू दिले नाही. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून हार्दिकला शिव्या दिल्या जात आहेत. त्याला सर्वात स्वार्थी खेळाडू देखील म्हटले जात आहे. हार्दिक आणि तिळक नाबाद परतले आणि भारताने सात गडी राखून वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. (हे देखील वाचा: तिसऱ्या टी-20 नंतर Suryakumar Yadav आणि Tilak Verma यांचा पहा मजेदार व्हिडिओ, BCCI ने केला शेअर)

 हार्दिक पांड्याला चाहंत्यानी केलं प्रचंड ट्रोल

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2023 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).