Google Doodle For IPL 2025: आयपीएलची रंगत वाढवण्यासाठी गुगलकडून खास डूडल; एकाच क्लिकवर मिळणार सामना, खेळाडूंची माहिती

हे गुगल डूडल खास क्रिकेट प्रेमींसाठी बनवण्यात आले आहे. ज्यामध्ये गुगलच्या लोगोमध्ये क्रिकेट बॉल-बॅच आणि पिच यांचा समावेश आहे.

PC-X

Google Doodle For IPL 2025: क्रिकेट प्रेमींसाठीची सर्वात प्रतीक्षित स्पर्धा, इंडियन प्रीमियर लीग 2025 (Indian Premier League 2025) आज संध्याकाळी सुरू होत आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील दोन महिने खास असणार आहेत. या लोकप्रिय प्रवासाला खास बनवण्यासाठी, जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन गुगलनेही आपली अनोखी साथ दिली आहे. हे गुगल डूडल खास क्रिकेट प्रेमींसाठी बनवण्यात आले आहे, ज्यामध्ये गुगलच्या लोगोमध्ये क्रिकेट बॉल-बॅच आणि पिच यांचा समावेश आहे. या अनोख्या डूडलने इंटरनेट वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि क्रिकेट चाहते ते सोशल मीडियावर देखील शेअर करत आहेत.

गुगल डूडल बहुतेकदा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला, कार्यक्रमाला किंवा विशेष प्रसंगाला समर्पित केले जाते आणि यावेळी ते आयपीएल 2025 च्या क्रिकेट थीमसह सादर करण्यात आले आहे. इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय क्रिकेट लीगपैकी एक आहे, ज्यामध्ये जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटू भाग घेतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement