IPL 2024 पूर्वी RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, AB de Villiers दिसू शकतो 'या' भूमिकेत

या फ्रँचायझीसाठी त्याने अनेक मॅच विनिंग इनिंग खेळल्या आहेत. हा खेळाडू आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांसाठी खेळला आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2024 सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर बंगलोर (RCB) च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखला जाणारा एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) संघात पुनरागमन करू शकतो. क्रिकबझने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अँडी फ्लॉवर मुख्य प्रशिक्षक बनल्याने डीव्हिलियर्स आरसीबीमध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसू शकतो. जरी याची अद्याप पुष्टी झालेली नाही. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स हा आरसीबीच्या सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आहे. या फ्रँचायझीसाठी त्याने अनेक मॅच विनिंग इनिंग खेळल्या आहेत. हा खेळाडू आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांसाठी खेळला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)