IND vs AFG 2nd T20I Live Score Update: भारताला बसला पहिला झटका, रोहित शर्मा पुन्हा शून्यावर आऊट, फारुकीने केले बोल्ड

भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने भारतासमोर 173 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्तानसाठी स्फोटक फलंदाज गुलबदिन नायबने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

IND vs AFG 2nd T20I Live Score Update: भारताला बसला पहिला झटका, रोहित शर्मा पुन्हा शून्यावर आऊट, फारुकीने केले बोल्ड
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

IND vs AFG 2nd T20I: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium, Indore) खेळवला जात आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून आतापर्यंतच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आजही अफगाणिस्तानला हरवण्यात भारताला यश आले तर ते मालिका खिशात घालतील. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही (Virat Kohli) संघात पुनरागमन केले आहे, अशा स्थितीत करोडो चाहत्यांची नजर कोहलीवर आहे. तत्तपुर्वी, भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने भारतासमोर 173 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्तानसाठी स्फोटक फलंदाज गुलबदिन नायबने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 173 धावा करायच्या आहेत. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला पहिला धक्का लागला आहे. रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला आहे. भारताचा स्कोर 5/1

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2024 08:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).