Delhi School Bomb Threat: दिल्लीतील रोहिणीत परीक्षेला उशीर करण्यासाठी 2 विद्यार्थ्यांची शाळांना बॉम्बची धमकी; समुपदेशनाचे आदेश
दिल्लीतील रोहिणी येथे परीक्षा उशीर घेण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी शाळांना थेट बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.
Delhi School Bomb Threat: दिल्लीतील रोहिणी (Rohini) जिल्ह्यामधे शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी परिक्षेची तयारी न झाल्यामुळे परीक्षेला उशीर करण्यासाठी संबंधित शाळांना बॉम्बच्या धमक्या (Bomb threat) दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही शाळांना धमकीचे ईमेल पाठवण्यात आले (Delhi School Bomb Threat)होते. ज्यामुळे स्पेशल सेलने त्वरित कारवाई केली. पोलिसांनी परिसर सुरक्षित करण्यासाठी अग्निशमन दल आणि बॉम्बशोधक पथके तैनात केली आहेत. सुरक्षिततेची खबरदारी म्हणून विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. तपासात परीक्षा उशिरा करण्यासाठी धमक्या दिल्याचे उघड झाले आहे. दिल्ली पोलिसांनी पुष्टी केल्यानुसार विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांना पुढील कारवाई न करता सोडण्यात आले.
2 विद्यार्थ्यांची शाळांना बॉम्बची धमकी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)