CWC Super League Points Table: अफगाणिस्तानची वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये सरशी, ऑस्ट्रेलिया-भारताला ढकलले खाली; पाकिस्तानचे स्थानही धोक्यात
अफगाणिस्तानने झिम्बाब्वेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेत अफगाणिस्तान संघाने आयसीसी विश्वचषक सुपर लीगच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि भारताला मागे टाकले आहे. याशिवाय पाकिस्तानचा संघ 2023 मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकातून बाहेर पडू शकतो. आयसीसीच्या नियमांनुसार, विश्वचषक सुपर लीगमध्ये पहिल्या सात स्थानांवर असलेला संघ थेट विश्वचषकासाठी पात्र ठरेल.
World Cup Super League Points Table: अफगाणिस्तानने (Afghanistan) झिम्बाब्वेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. या विजयानंतर अफगाणिस्तानचे 10 गुण असून संघाने आता विश्वचषक सुपर लीगच्या (World Cup Super League) गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारताला (India) मागे टाकले आहे. अफगाणिस्तान तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Afghanistan on the move after victory over Zimbabwe 👏
How they claimed the 10 points in the second #ZIMvAFG ODI 👉 https://t.co/Y6wq1fNvDE pic.twitter.com/toeNWGwPGG
— ICC (@ICC) June 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2022 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

