LSG vs CSK, IPL 2024 34th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 34 वा सामना (IPL 2024) लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (LSG vs CSK) यांच्यात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, लखनौ सुपरजायंट्सने चन्नई विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना चन्नईने लखनौसमोर 177 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने 56 नाबाद धावांची शानदार खेळी खेळली. लखनौ सुपर जायंट्सकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लखनौ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 177 धावा करायच्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)