Afghanistan vs Nepal ACC Under 19 Asia Cup 2024 Toss Update: : नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पहा दोन्ही संघांचे प्लेइंग 11

एसीसी अंडर-19 आशिया कप 2024 चा 10 वा सामना आज शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तान अंडर 19 संघ विरुद्ध नेपाळ राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे.

Afghanistan vs Nepal ACC Under 19 Asia Cup 2024 Toss Update: : नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पहा दोन्ही संघांचे प्लेइंग 11
Photo Credit- X

Afghanistan National Under-19 Cricket Team vs Nepal National Under-19 Cricket Team ACC U19 Asia Cup 2024 Toss Update: एसीसी अंडर-19 आशिया चषक 2024 चा 10 वा सामना आज अफगाणिस्तान-नेपाळ (Afghanistan vs Nepal) संघात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. अफगाणिस्तान अंडर-19 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत विशेष कामगिरी केलेली नाही. अफगाणिस्तानला त्याच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, नेपाळ संघालाही आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे नेपाळचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचे प्लेइंग 11 पाहू.

दोन्ही संघातील खेळाडू

अफगाणिस्तान: मेहबूब खान (कर्णधार), उझैरुल्ला नियाझाई, फैसल खान अहमदझाई, बरकत इब्राहिमझाई, हमजा खान अलीखिल (विकेटकीपर), नझीफुल्ला अमीरी, नसीर खान मारूफखिल, इझात बरकझाई, एएम गझनफर, अब्दुल अजीज, खातीर स्तानिक .

नेपाळ: आकाश त्रिपाठी, माया यादव, अर्जुन कुमल, नरिन भट्टा, संतोष यादव, उत्तम थापा मगर (विकेटकीपर), रोशन बिश्वकर्मा, नरेन सौद, अभिषेक तिवारी, हेमंत धामी (कर्णधार), उनेश बिक्रम सिंग.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2024 10:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).