Mumbai 26/11 Terror Attack: विराट कोहलीने दहशतवादी हल्ल्याच्या 13 व्या वर्धापनदिना निमित्त शहीदांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाला- ‘हा दिवस कधीही विसरणार नाही’

मुंबईतील ताज हॉटेलसह इतर अनेक ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला नरसंहाराच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहे. 13 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ज्यांनी आपले प्राण गमावले होते त्यांचे स्मरण करत भारतीय क्रिकेट विराट कोहलीने ट्विटरवर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

विराट कोहलीची शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Photo Credit: Twitter, Instagram)

2008 मध्ये आजच्या दिवशी मुंबईतील (Mumbai) भीषण दहशतवादी हल्ल्यात (Terror Attack) ज्यांनी प्राण गमावले त्यांना भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) श्रद्धांजली वाहिली आहे. “आम्ही हा दिवस कधीच विसरणार नाही, गमावलेले जीवन आम्ही कधीही विसरणार नाही. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्या मित्रांना आणि कुटुंबियांना माझ्या प्रार्थना पाठवत आहे,” विराटने ट्विट केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)