Mumbai 26/11 Terror Attack: विराट कोहलीने दहशतवादी हल्ल्याच्या 13 व्या वर्धापनदिना निमित्त शहीदांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाला- ‘हा दिवस कधीही विसरणार नाही’
मुंबईवर झालेल्या भयावह दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्षे पूर्ण झाली. मुंबईतील ताज हॉटेलसह इतर अनेक ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला नरसंहाराच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहे. 13 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ज्यांनी आपले प्राण गमावले होते त्यांचे स्मरण करत भारतीय क्रिकेट विराट कोहलीने ट्विटरवर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
2008 मध्ये आजच्या दिवशी मुंबईतील (Mumbai) भीषण दहशतवादी हल्ल्यात (Terror Attack) ज्यांनी प्राण गमावले त्यांना भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) श्रद्धांजली वाहिली आहे. “आम्ही हा दिवस कधीच विसरणार नाही, गमावलेले जीवन आम्ही कधीही विसरणार नाही. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्या मित्रांना आणि कुटुंबियांना माझ्या प्रार्थना पाठवत आहे,” विराटने ट्विट केले.
We will never forget this day, we will never forget the lives lost. Sending my prayers to the friends and families who lost their loved ones 🙏
— Virat Kohli (@imVkohli) November 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2021 01:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

