Commonwealth Games 2022: अचंता शरथ कमलने टेबल टेनिस फायनलमध्ये सुवर्णपदकावर कोरले नाव
सोमवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा पराभव करून त्याने पदक जिंकले.
बर्मिंगहॅम (Birmingham) येथे खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला टेबल टेनिसमध्ये (Table tennis) आणखी एक पदक मिळाले असून हे पदक देशाचा अनुभवी खेळाडू अचंता शरथ कमल (Achanta Sharath Kamal) याने दिले आहे. अचंताने पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावले आहे. सोमवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा पराभव करून त्याने पदक जिंकले. अचंताने हा सामना 11-13, 11-7, 11-2, 11-7 असा जिंकला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)