Viral video: ‘तू आलीस तर मुलगी बनून ये…’ आनंद महिंद्रा यांनी मुलींना समर्पित हा खास हृदयस्पर्शी व्हिडिओ केला शेअर
आज जरी आपण आधुनिकतेच्या युगात वावरत आहोत, जिथे स्त्री-पुरुष समानतेची चर्चा केली जाते, पण वास्तव हे आहे की, आजही बहुतांश लोकांना मुलगा हवा आहे. आजही बहुतेक लोकांना आपल्या घरात मुलगा व्हावा असे वाटते, पण काही लोक असे आहेत ज्यांना मुलीच हव्या आहेत. दरम्यान, देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे.
Viral video: आज जरी आपण आधुनिकतेच्या युगात वावरत आहोत, जिथे स्त्री-पुरुष समानतेची चर्चा केली जाते, पण वास्तव हे आहे की, आजही बहुतांश लोकांना मुलगा हवा आहे. आजही बहुतेक लोकांना आपल्या घरात मुलगा व्हावा असे वाटते, पण काही लोक असे आहेत ज्यांना मुलीच हव्या आहेत. दरम्यान, देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे, जो मुलींना समर्पित आहे. यासोबत त्याने कॅप्शन लिहिले आहे - आणि देवाने आम्हाला दोन मुली दिल्या, ज्यांनी आमचे जग उजळले (पियुष पांडे आणि त्यांच्या टीमचे त्यांच्या अद्भुत आणि हृदयस्पर्शी कार्याबद्दल अभिनंदन). लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला असून तो लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. हे देखील वाचा: Antibiotic Resistance: सतत अँटिबायोटिक्स घेणाऱ्यांनो सावध व्हा! येत्या 25 वर्षात होऊ शकतो जवळपास 4 कोटी लोकांचा मृत्यू- Reports
मुलींना समर्पित हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)