Viral Video: छठपूजेसाठी यमुनेच्या प्रदूषित फेसाळलेल्या पाण्यात महिला करत आहे पूजा, व्हिडीओ व्हायरल

मात्र दिल्लीत महिलांना यमुनेच्या प्रदूषित फेसाळलेल्या पाण्यात डुबकी मारावी लागत आहे. यमुना नदीच्या फेसाळणाऱ्या दूषित पाण्यात महिला अंघोळ करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यमुनेची प्रदूषण पातळी इतकी वाढली आहे की त्यात बर्फासारखा फेस दिसू लागला आहे. यमुनेत पाणी नाही, फक्त फेस दिसतो.

Viral Video

Viral Video: छठ पूजेच्या दिवशी महिला नदीत डुबकी मारून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. मात्र दिल्लीत महिलांना यमुनेच्या प्रदूषित फेसाळलेल्या पाण्यात डुबकी मारावी लागत आहे. यमुना नदीच्या फेसाळणाऱ्या दूषित पाण्यात महिला अंघोळ करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यमुनेची प्रदूषण पातळी इतकी वाढली आहे की त्यात बर्फासारखा फेस दिसू लागला आहे. यमुनेत पाणी नाही, फक्त फेस दिसतो. दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने अनेक ठिकाणी फवारणी करून ती दूर केली होती. पण हा फेस सतत तयार होत आहे. या नदीच्या पाण्यात आंघोळ करणे धोकादायक ठरू शकते, तरीही महिला कोणतीही चिंता न करता आंघोळ करत आहेत. ट्विटरवर @Nikhil0294 या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

येथे पाहा, व्हायरल व्हिडीओ