Punjab Tragedy: : गारमेंट शोरूममधील काचेचा दरवाजा पडल्याने 3 वर्षीय मुलीचा मृत्यू (Watch Video)
कपड्याच्या शोरूमचा दरवाजा अंगावर पडल्याने एका 3 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला. ही घटना पंजाबमधील लुधियाना येथील घुमर मंडी येथे घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाली आहे. या घटनेचे चित्रण करणारा 19-सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
कपड्याच्या शोरूमचा दरवाजा अंगावर पडल्याने एका 3 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला. ही घटना पंजाबमधील लुधियाना येथील घुमर मंडी येथे घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाली आहे. या घटनेचे चित्रण करणारा 19-सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये शोरूममध्ये लहान मुलगा खेळत असताना दरवाजा अचानक पडताना दिसतो. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मुलगी हँडल धरून दरवाज्याभोवती खेळण्यात गुंतलेली होती. इतक्यात तिच्या अंगावर संपूर्ण दरवाजाच कोसळा. व्हिडिओमध्ये काचेचा दरवाजा पडल्याने पीडित तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे दुःखद दृश्य पाहायला मिळते. जखमी मुलीला दयानंद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (DMCH) तातडीने दाखल करण्यात आले. तिच्यावर वैद्यकी उपचार करण्यात आले. मात्र, उपचारांना तिच्या शरीराने प्रतिसाद दिला नाही. पुढच्या काहीच वेळात DMCH येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)