'Ice Cream Chor' Caught on Camera in Mumbai: बोरिवलीतील सुपरमार्केटमधून चोरट्यांनी चोरला आईस्क्रीमसह डीप फ्रीझर; आईस्क्रीम चोरांचा CCTV व्हिडिओ व्हायरल
रेफ्रिजरेटर खूप जड असल्याने चोरट्यांनी ते नेण्यासाठी धडपड केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अखेर ते हा डीप फ्रीझर एका ट्रकमध्ये नेण्यात यशस्वी झाले.
Ice Cream Chor Caught on Camera in Mumbai: मुंबईतील बोरिवली येथे चोरट्यांची एक टोळी आईस्क्रीमसह डीप फ्रीझर चोरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आयसी कॉलनीतील डेली नीड्स सुपरमार्केटमध्ये ही चोरी झाली. व्हिडिओ फुटेजमध्ये तीन चोर डीप फ्रीजरला आउटलेटच्या बाहेर ढकलताना दिसत आहेत. रेफ्रिजरेटर खूप जड असल्याने चोरट्यांनी ते नेण्यासाठी धडपड केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अखेर ते हा डीप फ्रीझर एका ट्रकमध्ये नेण्यात यशस्वी झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा -Snake Attack in Karnataka Video: घराच्या दारात पडून असलेल्या सापाच्या हल्ल्यापासून थोडक्यात बचावली लहान मुलगी; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ (Watch))
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)