Snake Found in Pune Hotel: पुण्यातील डीपी रोडवरील एका हॉटेलमध्ये आढळला साप; जेवण करण्यासाठी आलेल्या नागरिकांचा उडाला गोंधळ(Watch Video)
आशीच एक घटना पुण्यातील डीपी रोडवरील एका हॉटेलमध्ये घडली.
Snake Found in Pune Hotel:पुण्यातील डीपी रोडवरील एका हॉटेलमधून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये लोक जेवत असताना त्यांच्या टेबल खालून साप जात असताना दिसत आहे. कुटुंबासोबत जेवणासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या पायाजवळ साप त्याला आढळला. एक साप त्याच्या पायाजवळ असल्याचे लक्षात येताच ही घटना उघडकीस आली. त्यानंतर हॉटेलमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सध्या पावसाचे दिवस आहेत. पुण्यात धुवाधार पाऊस कोसळत आहे. त्यातच डीपी रोडवरील अनेक हॉटेल्स नदीपात्राजवळ असल्याने साप हॉटेलमध्ये शिरला. त्यामुळे काही काळ तेथे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. (हेही वाचा: Stacks of Love: तिच्यासाठी काय पण! गर्लफ्रेंडच्या भव्य स्वागतासाठी दुबईतील व्यापाऱ्याने चक्क पैशांचा गालिचा अंथरला)
व्हिडीओ पहा-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)