Monkeys Swimming Video: कडक उन्हाचा माकडांनाही फटका, बोरिवलीत स्विमींग पूलमध्ये घेतला पोहण्याचा आनंद; पहा धमालमस्तीचा व्हिडीओ

बोरिवलीत एका स्विमींग पूलमध्ये माकडांचा एक कळप पोहताना दिसला. पाच ते सहा माकडांचा कळप दुपारच्या कडक उन्हात स्विमींग पूलमधील थंडगार पाण्याचा आनंद (Monkeys Swimming Video)लुटताना दिसत आहेत.

Photo Credit -X

Monkeys Swimming Video: उष्णतेच्या तीव्र झळा(Heat Wave)चा जसा माणसांना त्रास होत आहे. तसाच त्याचा त्रास प्राण्यांनाही होताना दिसतो आहे. बोरिवलीत एका स्विमींग पूल(swimming pool)मध्ये माकडांचा एक कळप पोहताना दिसला. तिथल्याच एक रहिवाश्याने माकडांचा हा व्हिडीओ कॅमेऱ्यात केल्याचे बोलले जात आहे. पाच ते सहा माकडांचा कळप दुपारच्या कडक उन्हात स्विमींग पूलमधील थंडगार पाण्याचा आनंद(Monkeys Enjoying Swimming) लुटताना दिसत आहेत. कधी ते पाण्याबाहेर मोकळ्या ठिकाणी खेळत आहेत. तर कधी ते पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. सध्या राज्यातील तापमान हे 40 अंशाच्या वर गेले आहे. काही ठिकाणी तर ते 42 अंशाच्या वर गेले आहे. (हेही वाचा :Viral Video: गर्मीपासून वाचण्यासाठी तरुणाने केली जबरदस्त युक्ती; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement