Itarsi: चालत्या रेल्वेमध्ये चढतांना घसरला पाय, आरपीएफ जवानाने केलेल्या कारवाईमुळे वाचले प्राण, पाहा घटनेचा थरारक व्हिडीओ
रेल्वे स्थानकावर अनेकदा निष्काळजीपणामुळे अनेकांचा मृत्यू होतो. असाच काहीसा निष्काळजीपणा इटारसी रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाला आहे. इटारसीमध्ये चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीचा पाय घसरला आणि तो व्यक्ती 30 मीटर पर्यंत फरफटत गेला, पुढे काय झाले पाहा
Itarsi: रेल्वे स्थानकावर अनेकदा निष्काळजीपणामुळे अनेकांचा मृत्यू होतो. असाच काहीसा निष्काळजीपणा इटारसी रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाला आहे. इटारसीमध्ये चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीचा पाय घसरला आणि तो व्यक्ती 30 मीटर पर्यंत फरफटत गेला. दरम्यान, तेथे सिव्हिल ड्रेसमध्ये उपस्थित आरपीएफ जवान हरप्रताप परमार यांनी त्या व्यक्तीला तात्काळ ट्रेनमध्ये लोटले. त्यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
पाहा व्हिडीओ:
पाहा व्हिडीओ :
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)